आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला सैर करुयात 1,493 फुट उंचीवरुन धावणाऱ्या चायनिज बबल ट्रामची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- बबल ट्राम ग्वांगझोऊ, चीन)
चायनिज बबल ट्राम बघितली तर हा एखादा आकाश पाळणा असावा असा समज होतो. पण वस्तुस्थिती अगदी वेगळी आहे. चीनमधील ग्वांगझोऊ या प्रांतात ही ट्राम असून तब्बल 1,493 उंचीवरुन धावते. यातून या शहराचे अगदी विहंगम दृष्य दिसते. स्थानिक आणि विदेशी पर्यटक सुर्योदय आणि सुर्यास्ताचा आनंद लुटण्यासाठी येथे येतात. विशेष म्हणजे याच शहराच्या धर्तीवर अहमदाबादचा विकास केला जाणार आहे.
600 मीटर उंचीसह ग्वांगझोऊतील कॅंटन टॉवर सगळ्यात उंच आहे. जगातिल उंच टॉवर्सचा विचार केला तर याचा तिसरा क्रमांक लागतो. याच टॉवरच्या उंच भागावर बबल ट्रामची निर्मिती करण्यात आली आहे. यात एकूण काचेचे 16 केबिन आहेत. 15 डिग्री कोनवर ही ट्राम प्रवास करते.
25 मिनिटांत एक चक्कर
बबल ट्राम एवढ्या कमी गतीने फिरते की टॉवरचा एक चक्कर मारण्यासाठी तिला 25 मिनिटांचा कालावधी लागतो. परंतु, या कालावधीत शहराचे मनमोहक दृष्य आपली नजर खेचून घेते.
पुन्हा स्काय ड्रॉपचा घ्या आनंद
या टॉवरवर पर्यटकांसाठी अनेक रोमांचक बाबी ठेवल्या आहेत. या टॉवरवर एक स्काय ड्रॉप सुविधाही आहे. ही बघितल्यावर तुम्हाला डिजनीलॅंडची आठवण येईल. यासाठी तुम्हाला बबल ट्र्रामपेक्षाही जास्त उंचीवर जावे लागेल. 485 मीटर उंच असलेले हे जगातिल सर्वांत उंच स्काय ड्रॉप आहे.
पुढील स्लाईडवर बघा, चायनिज बबल ट्रामची दिलखेचक दृष्ये....