Home | International | China | china buy nuclear tech. to pak & iran, international

चीनने पाकिस्तान व इराणला क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान विकल्याने अमेरिका भडकली

agency | Update - Jun 16, 2011, 01:32 PM IST

अमेरिकेने कडक भूमिका घेण्याची गरज असून चीनवर निर्बध्द घालण्याचा विचार करावा, असे सीआरएसच्या अहवालात म्हटले आहे.

 • china buy nuclear tech. to pak & iran, international

  china_250_01वाशिंग्टन- अमेरिकेच्या संसदेतील संशोधन करणारी संस्था कॉँग्रेसनल रिसर्च सर्विस (सीआरएस)ने दिलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, चीन हा पाकिस्तान व इराणसारख्या देशांना अणुबॉँम्ब व क्षेपणास्त्र बनविण्याचे तंत्रज्ञान विकून जगात नवीन धोका निर्माण करत आहे. तसेच यामुळे शस्त्रास्त्राच्या व्यवहारात वाढ झाली असून अशाप्रकारच्या धोकादायक वस्तूच्या व्यापारामुळे त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे म्हटले आहे. यामुळे चीनने केलेल्या करारानुसार गोपनीयतेबाबत प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. अमेरिकेने याबाबतीत कडक भूमिका घेण्याची गरज असून चीनवर निर्बध्द घालण्याचा विचार करावा, असे अहवालात म्हटले आहे.
  सीआरएस ही अमेरिका संसदेतील स्वतंत्र संस्था आहे. जी विविध मुद्यांवर आपला अहवाल बनवून संसदेला देते. त्यानुसार अमेरिका सरकार देशातील व जागतिक पातळीवरील धोरणे ठरवते.
  या अहवालात म्हटले आहे की, चीनने अमेरिकेची नाराजी घालवण्यासाठी व शांत करण्यासाठी काही पावले उचचली आहेत. तरीही चीनने पाकिस्तान व इराणसारख्या घातक देशांना क्षेपणास्त्रांतील तंत्रज्ञान विकणे थांबवले नाही. सीआरएसला मिळालेल्या काही महत्त्वपूर्ण कागदपत्राच्या आधारे त्यांनी हा गोपनीय अहवाल बनविला आहे.
  यापूर्वी बुश प्रशासनाने पाकिस्तान, इराण आणि आणखी एका देशाला रासायनिक तंत्रज्ञान दिल्याबद्दल चीनवर काही प्रमाणात प्रतिबंध घातले होते. मात्र ते पुरेसे व प्रभावशाली नसल्याचे संसदेने म्हटले आहे. सप्टेंबर २००१ नंतर चीनच्या एका कंपनीने पाकिस्तानला क्षेपणास्त्र तंत्रज्ञान दिल्याबद्दलही निर्बध्द घातले होते. मात्र चीनवर त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून येते. २००९ मध्येही ओबामा प्रशासनाने चीन व त्यांच्या सरकारी कंपन्यांवर सहा वेळा निर्बध्द लावले होते. तरीही चीनने आपला उद्योग चालू ठेवल्याने अमेरिका चीनवर भडकली आहे.
  अमेरिका व इराण यांचे संबंध अतिशय तणावपूर्ण आहेत. तसेच खासकरुन कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानमध्ये ठार केल्यानंतर दोन्ही देशांत संबंध ताणले आहेत.Trending