Home | International | China | china did cyber attack on usa, inertnational

चीनने केला अमेरिकेवर सायबर हल्ला- दोन्ही देशांत युध्दाची शक्यता वाढली

agency | Update - Jun 02, 2011, 01:48 PM IST

चीनने अमेरिकेवर सायबर हल्ला केला असून, चीनच्या हॅकर्सनी मोठ्या प्रमाणात संगणकाच्या माध्यमातून गोपनीय माहिती चोरली असून अशा स्थितीत दोन्ही देशांत तणावपूर्ण वातावरण असून अमेरिकेने सैन्य कारवाई करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे या दोन देशांत युध्दाची शक्यता निर्माण झाली आहे.

  • china did cyber attack on usa, inertnational

    china_258_01चीनने अमेरिकेवर सायबर हल्ला केला असून, चीनच्या हॅकर्सनी मोठ्या प्रमाणात संगणकाच्या माध्यमातून गोपनीय माहिती चोरली असून अशा स्थितीत दोन्ही देशांत तणावपूर्ण वातावरण असून अमेरिकेने सैन्य कारवाई करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे या दोन देशांत युध्दाची शक्यता निर्माण झाली आहे.

    चीनच्या हॅकर्सनी मोठ्या प्रमाणात अमेरिका, दक्षिण कोरिया या देशांतील परराष्ट्र पातळीवरील व संरक्षणविषयक अत्यंत गोपनीय माहिती चोरली आहे. त्याशिवाय चीनमधील सरकारविरोधी नेत्यांची बारीक-सारीक माहिती हॅक करुन मिळवली आहे.
    गुगलने याबाबत म्हटले आहे की, या प्रकरणात चीन सरकारचाही सहभाग असण्याची शक्यता आहे. याबाबत पेंटागनचे प्रवक्ते कर्नल डेव लापन यांनी सांगितले, कोणत्याही देशांनी सायबर हल्ला केला तर आम्ही सगळे पर्याय खुले ठेवू. अगदी गरज पडली तर युध्दाची तयारी करु. त्यामुळे अमेरिका-चीन यांच्यात सायबर हल्ल्यावरुन सैनिकी युध्द होण्याची शक्यता आहे.Trending