आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रॅगनची गती मंदावली!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिजींग,सेऊल - भारतापाठोपाठ चीनमध्येही अर्थव्यवस्था हळूहळू मंदावली असल्याचे दिसून येत आहे. मे महिन्यात चीनच्या औद्योगिक उत्पादनात घट झाली आहे. चीनचा शेजारी देश दक्षिण कोरियालाही मंदीचा विळखा पडण्याची चिन्हे आहेत. कोरियाची निर्यात कमालीची घटली आहे.

सन 2008 च्या जगभरातील मंदीमध्ये भारत आणि चीनच्या अर्थव्यवस्थेने जागतिक अर्थकारणाला टेकू दिला होता. यंदा मात्र चीनच्या औद्योगिक तसेच उत्पादन क्षेत्रामध्ये घट झाल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.तसेच दक्षिण कोरियातून चीन,अमेरिका,युरोपमध्ये होणार्‍या निर्यातीत घट झाली आहे.

चीनचा आर्थिक विकास दर यंदाच्या वर्षातील दुसर्‍या तिमाहीमध्ये 7.9 टक्यांवर घसरण्याची शक्यता आहे. असे झाल्यास सन 2009 नंतर चीनचा विकास दर आठ टक्यांच्या खाली येण्याची ही पहिलीच वेळ असेल.असे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे.

युरो चलनातही गेल्या 23 महिन्यांमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. जपानचा शेअर बाजारही सलग नवव्या आठवड्यात गडगडला असूनएवढी मोठी घसरण होण्याची ही गेल्या 20 वर्षातील पहिलीच घटना आहे. भारतामध्ये गेल्या मार्च पासून आजतागायत रुपयामध्ये 13 टक्के घसरण झाली आहे. तसेच गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार सन 2011-12 या आर्थिक वर्षात 6.5 टक्के विकास दर नोंदवण्यात आला आहे. विकास दराचे आकडे निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री प्रणव मुखर्जीही व्यक्त केली होती. वित्तीय तूट कमी करण्यासाठी महागाईला लगाम व गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जाईल असेही ते म्हणाले होते.

गुंतवणूकदारांना विश्वास

शुक्रवारी जपानचा निक्केई 0.7टक्के ,दक्षिण कोरियाचा कोस्पी 02 टक्के, ऑस्ट्रेलियाचा एस अँड पी 0.3 टक्यांनी घसरले.इंडोनेशिया आणि न्यूझीलंडच्या बाजारांमध्येही घसरण झाली. परंतु चीन आणि हाँगकाँगचे शेअर बाजार मात्र थोडेसे वाढले कारण चीन अर्थव्यवस्था रुळावर आणेल असा विश्वास गुंतवणूकदारांना आहे.
कोट्यवधींची क्रयशक्ती नापास, म्हणून मंदी पास
जागतिक मंदी, कर्जसंकटामुळे श्रीमंत देश देशोधडीला!