आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महासत्तेच्या दिशेने निघालेल्या देशातील शिक्षणाची खडतर वाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत असलेल्या चीनमध्ये सर्व काही आलबेल आहे, असे मुळीच नाही. गुईझोऊ प्रांतातील शेंगजीमधील बान्पो प्राथमिक शाळेचे हे दृश्य त्याचेच बोलके उदाहरण आहे. ही शाळा एका उभ्या डोंगराच्या मध्यावर बांधण्यात आली आहे. या शाळेमध्ये एकूण 68 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी 20 विद्यार्थी नजीकच्या गेंग्गुआन खेड्यात राहतात. या विद्यार्थ्यांना डोंगराची कपार कोरून तयार करण्यात आलेल्या अगदीच अरुंद पायवाटेने दररोज शाळेत यावे लागते. 37 वर्षीय शी लियांगफन हे शाळेचे मुख्याध्यापक आहेत. विद्यार्थ्यांना ते गणिताबरोबरच जिमही शिकवतात. दररोज ते या विद्यार्थ्यांना त्या अरुंद पायवाटेने शाळेत स्वत:च घेऊन येतात.