आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Expanding Rail Network In Tibet Nears Sikkim

भारतीय सीमेपर्यंत रेल्वे जाळे वाढवत आहे चीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात उंच ठिकाणी असणा-या चिंघई- तिबेटमध्ये असणारे रेल्वे जाळ्याचा चीन आता भारतीय सिमेपर्यंत विस्तार करणार आहे. पंचेन लामा यांचे शहर शीगाजपर्यंत ही रेल्वे लाइन वाढणार आहे. या शहराची सीमा सिक्कमच्या सिमेला लागुण आहे. या रेल्वे लाइनमुळे आता चीन भारतीय सीमेपर्यंत हत्यारे पोहचवू शकेल.
चीन आता एकाच बाणाने दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करत आहे. याप्रकारे चीन राजकीय आणि इतर हेतू पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. पचेंन लामाचेशहर असणा-या गृहनगरपर्यंत जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी चीन ही रेल्वे लाइन तयार करत आहे. चीन जगभरात आपली ओळख वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
पंचेन लामा हे चीनमधील पिपल पॉलिटिकल कंस्ल्टेटिवचे सदस्य आहेत. ते त्याचा जास्त वेळ बिजिंगमध्येच घालवतात. सरकारचे सर्मथन करणारे चीन आणि बौद्ध असोसिएशनमध्ये पचेंन लामा प्रसिद्ध आहेत. चीन आता त्यांच्या भागापर्यंत पोहोचून वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. दलाई लामानंतर पंचेन लामाला मुख्य ठरले आहेत. दलाई लामांचा सामना करण्यासाठी चीन गेल्या 24 वर्षांपासून प्रयत्न करत आहे.
या नवीन मार्गामुळे आता ल्हासा ते शीगाजपर्यंत केवळ दोन तासात पोहोचता येईल. 253 किलोमिटरची ही रेल्वे लाइन आक्टोबरच्या आधी सुरू होणार आहे. 93 टक्के काम पूर्ण झाल्याचे रेल्वे आधिका-यांनी सांगितले आहे.
शीगाजची सीमा भारताच्या सिक्किम सोबतच नेपाळ आणि भुटानच्या सीमेला जोडलेली आहे. या रेल्वे मार्गानंतर पिपल्स लिबरेशन आर्मीला भारतीय सीमेपर्यंत मशीन आणि हत्यारे पोहोचवणे सोपे होईल. नेपाळ सरकारने चीनला शीगेट्सपर्यंत रेल्वे जाळे वाढवण्याची विनंती केली आहे.