आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China First Time Declares Number Of Its Soldiers

चीनच्‍या सैनिकांची संख्‍या भारतापेक्षा कमी, प्रथमच ड्रॅगनने जाहीर केली आकडेवारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील महासत्तांपैकी एक चीनने लष्‍करी सामर्थ्‍य प्रथमच जाहीर केले. त्‍यात महत्त्वाची बाब म्‍हणजे, चीनच्या थलसैनिकांची संख्‍या भारतापेक्षा कमी असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

चीनने प्रथमच सैन्‍याबाबत श्‍वेत पत्रिका जारी केली. त्‍यात पीपल्‍स लिबरेशन आर्मीच्‍या अहवालाचा समावेश आहे. त्‍यात सर्व लष्‍करी दलांची संख्‍या जाहीर करण्‍यात आली आहे. भारताकडे 11 लाख 29 हजार 900 सैनिक आहेत. तसेच 9 लाख 60 हजार रिझर्व्‍ह सैनिक आहेत. तर चीनकडे 8.5 लाख थल सैनिक आहेत. ही संख्‍या जाहीर करुन चीनने भारताला नव्‍हे तर अमेरिकेला निशाण्‍यावर घेतले आहे.

थल सेनेच्‍या बाबतीत भारत चीनच्‍या पुढे असला तरी नौदल आणि वायुसेनेच्‍या बाबतीत भारत मागे आहे. चीनकडे 2.35 लाख नौसैनिक आहेत. तर भारताकडे केवळ 58 हजार 350 नौसैनिक आहेत. तसेच वायुसेनेचा विचार केल्‍यास चीनकडे 3 लाख 98 हजार वायुसैनिक आहेत. तर भारताकडे 1 लाख 27 हजार सैनिक आहेत. चीनकडे एकूण 14.83 लाख सैन्‍य आहे. तर भारताकडे एकूण 22.74 लाख सैन्‍य आहे.