आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्‍यावर तरंगणारे आगळेवेगळे गाव, येथे राहातात 7000 मच्‍छीमार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाण्‍यावर तरंगणा-या गावाबद्धल तुम्‍ही कधी ऐकले आहे, नक्कीच ऐकले नसेल. मात्र चीनमध्‍ये मासेमारी व्‍यावसाय करण्‍यासाठी मच्‍छीमारांनी पाण्‍यावर तरंगणारे गाव तयार केले आहे. समुद्राच्‍या पाण्‍यावर तयार केलेल्‍या गावात 7000 मच्‍छीमार राहतात. चीनच्‍या बोली भाषेमध्‍ये मच्‍छीमारांना 'टंका' नावाने ओळखले जाते. चीनच्‍या दक्षिणपूर्व 'फुजियान' प्रांतातील निंग्‍डे (Ningde) शहराजवळ 'जिप्सी ऑन द सी' नावाचे गाव तयार करण्‍यात आले आहे.
मच्‍छीमारांनी स्‍वीकारला नाही बदल-
माहिती तंत्रज्ञानाच्‍या युगात लाईफस्‍टाईल बदलली असली तरी या मच्‍छीमारांनी मात्र आपली परंपरा कायम ठेवली आहे. चीन मध्‍ये इ.स. पूर्व 700 वर्षापुर्वी तांग राजवंशाची राजवट होती. या काळात मच्‍छीमारांनी समुद्रातच राहण्‍याचा निर्णय घेतला. तेव्‍हा पासून 'जिप्सी ऑन द सी' गाव आपले आस्तित्‍व टिकवून आहे. 'टंका' लोकांचे जीवन हे मासेमारीवर आवलंबून असल्‍यामुळे पाण्‍यातच तरंगणारे घर तयार केली आहेत. घराशिवाय मोठमोठी प्‍लेटफॉर्म तयार केले आहेत. चीन सरकार 'टंका' जमातील मुख्‍य प्रवाहात आणण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. मात्र या गावक-यांना पाण्‍यात राहण्‍यात आनंद वाटतो.
पुढील स्‍लाईडवर पाहा 'जिप्सी ऑन द सी' गावाची फोटो...