Home | International | China | china flood

चीनमध्ये पावसाचे 13 बळी, पुरात 10 बेपत्ता

वृत्तसंस्था | Update - Sep 20, 2011, 12:46 AM IST

देशाच्या अनेक भागांना काही दिवसांपासून पावसाचा तडाखा बसला असून सोमवारी बेझोंग शहरातील विविध घटनांत 13 जणांचा मृत्यू झाला.

  • china flood

    बीजिंग। दक्षिण-पश्चिम चीनमधील सिचून प्रांताला पावसाने झोडपले असून आतापर्यंत 13 बळी गेले आहेत. देशाच्या अनेक भागांना काही दिवसांपासून पावसाचा तडाखा बसला असून सोमवारी बेझोंग शहरातील विविध घटनांत 13 जणांचा मृत्यू झाला. नानजिआंग भागात सहा लोकांचा मृत्यू झाला. टॉंगजिआंगमध्ये पाच मृत्यू झाले. या घटना दरड कोसळून झाल्या असल्याचे सुत्रांनी सांगितले. या भागातील नद्यांना पुर आल्यामुळे दहा लोक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.

Trending