आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: चीनमध्येही झालाय महापूराने विध्वंस!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- ढगफुटीमुळे उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयात हजारो लोक मृत्युमुखी पडले. चीनच्या पश्चिम प्रांतात झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तराखंडसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या ५० वर्षांमधील हा सर्वांत भयानक महापूर आहे. काही भागांमध्ये भुस्खलन आणि इमारती कोसळल्यामुळे ४० जण मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती आहे.

चीनमधील सिचुआन प्रांतात मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. भुस्खलनामुळे सुमारे ११ कुटुंब ढिगारयांखाली गाडले गेले आहेत. २०० पेक्षा जास्त घरे रिकामी करण्यात आली आहेत. महापूरामुळे तीन पुलांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सखोल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. त्याचा वाहतूकीवर परिणाम झाला आहे. या परिस्थितीत सुधारणा होण्याची काही दिवस लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चीनमधील महापूराची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा