Home | International | China | china, flud rains, 105 people dead, international

वादळी पावसाचे चीनमध्ये धैमान सुरुच

agency | Update - Jun 16, 2011, 06:17 PM IST

वादळी पावसाचे चीनमध्ये धैमान सुरुच असून आतापर्यंत १०५ लोकांचे बळी घेतले आहेत

  • china, flud rains, 105 people dead, international

    बीजिंग- गेल्या दहा दिवसापासून चीनमध्ये सुरु असलेल्या वादळी पावसामुळे चीनमधील जनजीवन विस्कळीत झाले असून बुधवारी चार जण मृत्युमुखी पडले आहेत. वादळी पावसाने आतापर्यंत १०५ लोकांचे बळी घेतले आहेत तर शेकडो जण बेपत्ता झाले आहेत.
    चीनमधील पूर्व व मध्य प्रांतांमधील ७५ हजार नागरिक विस्थापित झाले आहेत.
    बुधवारी नव्याने मिळालेल्या माहितीनुसार, चार जण मरण पावले तर सात जण बेपत्ता झाले आहेत. वीज पडल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. जिआन्गझी प्रांतामधून ७०,१०० नागरिकांना आपले घरदार सोडावे लागले आहे. तर, सुमारे १,३२० घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

Trending