आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमधील फॅक्टरीला लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू, तर 13 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झिनान - पूर्व चीनच्या शेंडॉंग प्रांतात रविवारी ( ता. 16) रात्री एका खाद्य पॅकेजिंग फॅक्टरीत लागलेल्या आगीत 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. शेंडॉंग प्रांतातील शोअगुआंग शहरात असलेल्या लोंगुयान खाद्य कंपनीच्या फॅक्टरीत आग लागली होती. त्यात 18 लोकांचा मृत्यू झाला, तर 13 जण जखमी झाले आहेत.
जखमींना हॉस्पीटलमध्‍ये भरती करण्‍यात आले आहे. पोलिसांनी फॅक्टरीच्या कार्यकारी व्यवस्थापकाला ताब्यात घेतले आहे. आगीमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.