आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Gives Green Signal To Railway Route Near Arunachal Pradesh

अरुणाचल प्रदेशजवळ आणखी एक रेल्वे मार्ग, 3685 अब्ज रुपयांच्या प्रस्तावास चीनची मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : तिबेटमध्ये तयार करण्यात आलेल्या किंघाई-तिबेट रेल्वे ट्रॅकची निगराणी करणारे चीनी कर्मचारी

बीजिंग - चीनने अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या तिबेटमध्ये आणखी एक रेल्वेमार्ग सुरू करण्याचा विचार केला आहे. त्यासाठी चीनने सहा अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 3685 अब्ज रुपयांच्या सामारिकदृष्ट्या महत्त्वाच्या या प्रकल्पाला शुक्रवारी मंजुरी दिली आहे.
शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसाप, ही रेल्वेलाईन तिबेटची राजधानी असलेल्या ल्हासा आणि नईनगचीला जोडणारी असेल. हा मार्ग तयार होण्यासाठी सात वर्षे लागतील. तिबेटमध्ये तयार होणार हा दुसरा सर्वात उंच रेल्वे मार्ग असेल. किंघई प्रांताला ल्हासाशी जोणारी किंघई-तिबेट रेल्वे गाडी येथे 2006 पासून सुरू आहे. ल्हासाला नईनगचीशी जोडण्याच्या योजनेची घोषणा ऑगस्ट महिन्यात झाली होती. नईनगची अरुणाचलच्या सीमेला लागून असलेले तिबेटमधील सर्वात जवळचे शहर आहे. एका अहवालानुसार चीनला 2020 पर्यंत नेपाळ, भूतान आणि भारताच्या सीमेजवळ सुमारे रेल्वे मार्गाचे जाळे पूर्ण करायचे आहे.
भारताने नुकतेच अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात रस्त्यांचे जाळे दुरुस्त करण्याची योजना जाहीर केल्यानंतर चीनने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या क्षेत्राला चीन दक्षिण तिबेट असल्याचे सांगत त्यावर दावा सांगत आहे. भारताने आणखी 54 बॉर्डर पोस्ट तयार करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना चीनी सैन्याचे प्रवक्ते यांग युजान म्हणाले होते की, भारताने अडचणी वाढतील असे पावले उचलण्या पूर्वी एकदा विचार करायला हवा. चीनच्या प्रवक्त्यांनी भारताच्या सीमाभागात शांती कायम राहण्यासाठी भारताने प्रयत्न करण्याचा सल्लाही दिला आहे.