आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमधील शाळेत प्रेमावर बंदी; विद्यार्थी- विद्यार्थिनींना लांब बसविण्याचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- चीनमधील एका माध्यमिक शाळेत विद्यार्थी- विद्यार्थिनींमध्ये प्रेमाचा अंकुर फुलण्याआधीच तो खुडून टाकर्‍याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा प्रशासनाने विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या संवादावर बंदी घातली आहे. विशेष म्हणजे त्यांच्यात जवळीकता वाढू नये, यासाठी त्यांना लांब बसविण्याचे आदेश देण्यात आले आहे. मा‍त्र प्रशासनाच्या या मनमानीला लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोध दर्शवला आहे.

सिल्क सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हांगजू शहरातील एका शाळेत विद्यार्थी-विद्यार्थिनींना कमीत कमी अर्धा मीटर अंतरावर बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच शाळेच्या परिसरात विद्यार्थी- विद्यार्थिनींना बोलणे तर दूरच एकत्र खेळणे आणि फिरण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचाही इशारा देण्यात आला आहे.

चीनमध्ये पहिल्या प्रेमाला 'जाओ लियान' असे संबोधले जाते. किशोरावस्थेत विद्यार्थी-विद्यार्थिनी एकमेकांकडे आकर्षित होतात. अभ्यासावरील त्यांचे लक्ष भरकटते. मोठे झाल्यानंतर ते विशेष प्रा‍विण्य दाखवू शकत नाहीत, असे शाळा प्रशासनाने म्हटले आहे.