Home | International | China | china honours indian with highest literary award

चीनमधील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार प्रथमच एका भारतीय प्राध्यापकाला

agency | Update - Sep 02, 2011, 04:03 PM IST

चीनमधील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार एका भारतीयाला प्रथमच मिळाला आहे

  • china honours indian with highest literary award

    बीजिंग - चीनमधील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार एका भारतीयाला प्रथमच मिळाला आहे. बी. आर. दीपक या भारतीय प्राध्यापकाचे नाव असून ते दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठामधील चीन व दक्षिण आशिया अभ्यास केंद्राचे संलग्न प्राध्यापक आहेत. प्रा. दीपक यांना सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे सांगण्यात आले
    प्रा. दीपक यांनी ८८ चिनी भाषेतील कवितांचा हिंदीमध्ये अनुवाद केला आहे. तसेच चिनी भाषेचा अभ्यास, भाषांतर, चिनी पुस्तकांचे भारतीय भाषांत प्रकाशन आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. दीपक यांना राज्याचे 'कौन्सिलर' लियू यानडोंग यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    ख्रिस्तपूर्व काळातील ११ ते १४ व्या शतकामधील विविध कालखंडात लिहिल्या गेलेल्या चिनी कवितांचा अनुवाद दीपक यांनी केला आहे. या कालखंडातील वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपरांचा परामर्श या पुस्तकामध्ये घेण्यात आला असून पुस्तकामध्येच मूळ चिनी मजकूरही पुरविण्यात आला आहे. देशभक्‍तीपर कविता तसेच वेगवेगळ्या चिनी राजवटींमधील लोकगीतांचाही समावेश या पुस्तकांमध्ये आहे. पौराणिक चिनी संस्कृतीची भारतीयांना विशेषत हिंदी भाषिकांना याची माहिती व गोडी लागावी यासाठी हा पुरस्कार भारतीयाला दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Trending