Home | International | China | china, india experess on vitanam topic, hard reaction

...तर चीननेही मग काश्मीरप्रश्नी नाक खुपसू नये- भारत

AGENCY | Update - Sep 16, 2011, 12:11 PM IST

व्हिएतनाममधून भारतीय कंपन्यांनी तेल काढू नये म्हणून चीनने नोंदविलेल्या राजनैतिक निषेध व्यक्त केल्यानंतर भारतानेही आज कडक पावले उचलले.

 • china, india experess on vitanam topic, hard reaction

  नवी दिल्ली- व्हिएतनाममधून भारतीय कंपन्यांनी तेल काढू नये म्हणून चीनने नोंदविलेल्या राजनैतिक निषेध व्यक्त केल्यानंतर भारतानेही आज कडक पावले उचलले. जर आम्हाला तेथे विरोध करणार असाल तर, पाकव्याप्त काश्मीरप्रश्नी चीनने नाक खुपसू नये व त्यापासून त्यांनी दूर रहावे, असा सज्जड दमच भरला आहे.
  चीनने भारताला बुधवारी झटका दिला होता. दक्षिण चीन समुद्रातून भारतास तेल काढण्यास चीनने मनाई केली आहे. इंडियन ऑईल विदेश लिमिटेड दक्षिण चीन समुद्रातून व्हिएतनाम ब्लॉक्समधून तेल आणि गॅस काढत आहे. यालाच चीनने विरोध केला आहे. ज्या क्षेत्रातून भारत तेल आणि गॅस काढत आहे तो भाग आपल्या अंतर्गत येत असून ते बेकायदेशीर असल्याचे चीनचे म्हणणे आहे. राजनैतिक स्तरावर चीनने आपला विरोध दर्शवला आहे.
  भारताकडून ज्या ब्लॉक्समधून तेल आणि गॅस काढण्यात येतो तो भाग व्हिएतनामच्या अधिकार क्षेत्रात आहे. त्यामुळे चीनचा आक्षेप अवैध असल्याचा दावा परराष्ट्र मंत्रालयातर्फे करण्यात आला आहे. १२७ आणि १२८ या ब्लॉकमधून तेल आणि गॅस काढण्याचा अधिकार व्हिएतनामने दिला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. युएन कन्व्हेंशनल लॉ ऑफ सी १९८२ अंतर्गत हा अधिकार भारताला मिळाला आहे. चीनच्या आक्षेपास उत्तर देण्यात येणार असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
  मात्र या सर्व घडमोडींमुळे चीनच्या पोटात दुखत असून, भारताला तेथे जाण्यास विरोध करत निषेध करण्यामागे तेलाला आलेले असाधारण महत्त्व हेच प्रमुख कारण आहे. त्यामुळे भारताने जर आम्हाला व्हिएतनाममध्ये जाणास आक्षेप घेणार असाल, तर तुम्ही सुध्दा पाकव्याप्त काश्मीरप्रश्नी नाक खुपसू नये. पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनच्या कारवाया वाढल्या असून, त्यांनी काही भागावर ताबा मिळविला आहे. त्याबाबत भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनची तक्रार केली आहे.
  तसेच चीनने पाकव्याप्त काश्मीरमध्ये काही विकासाची कामे हाती घेतली आहेत. त्याला भारताने विरोध केला होता. मात्र चीनने ही नागरी कामे असल्याचे सांगत काम सुरुच ठेवले आहे. चीनने भारताबाबत दुटप्पी भूमिका घेतली असून, पाकिस्तानबरोबरची त्यांची मैत्री बहारत चालली आहे. मागील महिन्यातच पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसीफ अली झरदारी यांनी चीनचा दौरा केला होता. तसेच चीन-पाकिस्तान या दोन्ही देशांतील नागरिकांनी पासपोर्टशिवाय प्रवास करावा, असे आवाहन केले होते.
  दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस.एम. कृष्णा हे १६ सप्टेंबरपासून व्हिएतनामच्या दौ-यावर जाणार आहेत. या दौ-यामध्ये हा मुद्दा भारतातर्फे उठवला जाऊ शकतो. तसेच चीनचे मुद्दे खोडून काढले जाऊ शकतात. आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार चीनचा तेथे अधिकृत काहीही संबंध येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.Trending