Home | International | China | china, international news

चिनी अधिकार्‍यांनी विदेशात दडवले 123 कोटी डॉलर्स

वृत्तसंस्था | Update - Jun 18, 2011, 03:13 AM IST

अवघ्या दोन दशकांच्या काळात चीनमधील भ्रष्ट अधिकार्‍यांनी 123 कोटी डॉलर्सहून अधिक रक्कम परदेशात पळविली असल्याचे सेंट्रल बँकेने जाहीर केले आहे.

  • china, international news

    बिजिंग: अवघ्या दोन दशकांच्या काळात चीनमधील भ्रष्ट अधिकार्‍यांनी 123 कोटी डॉलर्सहून अधिक रक्कम परदेशात पळविली असल्याचे सेंट्रल बँकेने जाहीर केले आहे. सेंट्रल बँकेने चीनमधील भ्रष्टाचाराबाबत केलेल्या अभ्यासात ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. चीनमधील 16,000 सरकारी अधिकारी आणि सरकारी मालकीच्या कंपन्यातील 18,000 अधिकार्‍यांनी भ्रष्ट मार्गाने मिळविलेले 800 कोटी यान (123.7 कोटी डॉलर्स) परदेशात दडवले आहेत, असे बँकेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.
    वरिष्ठ स्तरावरील अधिकारी मोठय़ा रकमा घेऊन अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियासारख्या विकसित देशांमध्ये परागंदा झाले आहेत, तर इतरांनी रशिया, थायलंडसारख्या देशात ही संपत्ती साठवून ठेवली आहे.
    भ्रष्टाचाराचा आरोप असलेले अनेक अधिकारी पाश्चात्त्य राष्ट्रांत जाण्याची परवानगी मिळेपर्यंत हाँगकाँगमध्ये, तर आफ्रिका, लॅटिन अमेरिका व पूर्व युरोपातील राज्यांमध्ये लपून बसले आहेत. 2008 च्या उपलब्ध माहितीच्या आधारे हे अध्ययन करण्यात आले आहे. सार्वजनिक संपत्तीचा हा अपहार कम्युनिस्ट पक्षाची विश्वासार्हता झपाट्याने कमी करण्यास कारणीभूत ठरत आहे. भ्रष्टाचारविरोधी मोहिमा चालवूनही तो कमी होत नसल्यामुळे कम्युनिस्ट पक्षासाठी मोठा धोका असल्याचा इशारा अध्यक्ष हु जिंताओ आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी दिलेला आहे.

Trending