Home | International | China | china is more dangerous for india, defence ministry plan for nextb 15 yr

चीनपासूनच सर्वात मोठा धोका; संरक्षण मंत्रालयाची तयारी जोरात

agency | Update - Jun 28, 2011, 07:38 PM IST

भारताला पाकिस्तानपासून फार धोका नसून चीनकडूनच भारताला मोठा धोका आहे, असा खुलासा संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

 • china is more dangerous for india, defence ministry plan for nextb 15 yr

  indiachina_258नवी दिल्ली- भारताला पाकिस्तानपासून फार धोका नसून चीनकडूनच भारताला मोठा धोका आहे, असा खुलासा संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
  संरक्षण मंत्रालयाने तीन भूदल, वायूदल, हवाईदल या तीन विभागाच्या पुढील १५ वर्षाच्या संरक्षणविषयक नियोजनाबाबत एक अहवाल बनविण्यात आला असून, त्यात पाकिस्तानपेक्षा चीनकडूनच भारताला जास्त धोका असल्याचे म्हटले आहे.
  भारतीय संरक्षण विभागाने २०१० ते २०२५ या कालावधीसाठी ही योजना तयार केली आहे. त्या योजनेनुसार २०१२ मध्ये भारत डोंगराळ भागात लढण्यासाठी खास ९०,००० हजार जवानाची फौज तयार करण्यात आली आहे. ही फौज लडाख व अरुणाचल प्रदेश सारख्या डोंगराळ भागात तैनात असेल. डोंगराळ भागात लढण्यासाठी खास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच यासाठी विशेष संशोधन करण्यावर भर राहील. तसेच चीनच्या सीमा रेषेवरील सर्व भागातील रस्ते तयार करण्यात येणार आहेत. तसेच ते पहिल्या टप्प्यात बनविण्यावर भर राहील. तसेच चीन सीमारेषावर विमानतळे बनविण्यावर भर राहील. आठ जास्तीचे विमानतळ मैदान बनविण्यात येणार आहे. 'एलओसी'पासून २५ किलोमीटरवर लढाऊ विमाने तैनात करण्यासाठी हवाई तळ बनविण्यात येणार आहे. या परिसरात पाच हजार घरे बांधण्यात येणार अशा घरात तापमान सामान्य राहील, अशी सोय करण्यात येणार आहे. या भागात तापमान शून्य ते उणे ४० पर्यंत खाली जाते. अशा काळात सैनिकांना लढणे कठीण जात असल्याने सामान्य तापमानरहित घरे (शेल्टर) बनविण्यात येणार आहेत.
  या योजनेनुसार नौदलासाठी खास योजना तयार केली जाणार आहे. युध्दाची जहाजे, पानबुड्डी, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे तैनात केली जाणार आहेत. अंदमान व निकोबारमध्ये नौदलाला बळकट करण्यात येणार आहे. त्यामुळे दक्षिण-पूर्व आशियावर लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे. तसेच भारत येत्या काही काळात ८ हजार किलोमीटरपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र तयार करणार आहे.
  अरुणाचल प्रदेशमध्ये चीन भारतात घुसखोरी वारंवार करत असून, अशी परिस्थिती भविष्यात कायम राहिली तर भारत कारगिलसारखे युध्द करु शकते.Trending