आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • China Issued New Map,Its Part Of Arunachal Kashmir

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुरापती चीन : नव्या नकाशात समाविष्ट केला अरूणाचल, जम्मू-काश्मीरचा भाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सीमावादाच्या प्रश्नावर चीनने पुन्हा एकदा भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनने नवीन नकाशाच्या माध्यमातून अरूणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या काही भागावर दावा केला आहे. वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकेच्या वृत्तपत्रातात हा नकाशा प्रसिद्ध झाला आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी चीनच्या दौर्‍यावर असताना हा प्रकार घडला आहे.
नकाशाने सत्य परिस्थिती बदलत नाही : परराष्ट्र मंत्रालय
चीनचा हा प्रयत्न निष्फळ ठरणार असल्याची प्रतिक्रिया भारताने दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरूद्दीन म्हणाले, "केवळ नकाशा बदलून सत्य परिस्थिती बदलणार नाही. अरूणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य घटक आहे आणि हे आम्ही वेळोवेळी चीन सरकारला स्पष्ट केले आहे. चीनचा हा दावा चुकीचा असून याबाबत त्यांच्याशी चर्चा केली जाईल."
मोदी सरकार आल्यानंतर चीनचे पहिलेच पाऊल
चीनने याआधीही अनेकदा अरूणाचल प्रदेशावर दावा केला आहे. त्यामुळे अनेकदा द्विपक्षीय संबंधही ताणले गेले. पण मोदींचे सरकार स्थापन झाल्यानंतर चीनने प्रथमच अशा प्रकारची कुरापत केली आहे.
नवीन युद्धाची तयारी- वॉशिंग्टन पोस्ट
वॉशिंग्टन पोस्टने याबाबत ''Could this map of China start a war?'' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले आहे. त्याचा सारांश चीन भारतासोबत नवीन युद्धाच्या तयारीत असल्याचा आहे. बातमीत दक्षिण-चीन समुद्र आणि वादग्रस्त दिआयु-सेनकाकू बेटांचा उल्लेख आहे पण त्याचबरोबर भारतीय प्रदेशाचाही सहभाग आहे. दक्षिण-चीन समुद्र आणि दिआयु-सेनकाकू बेटांवर चीनचा जपानशी वाद आहे.
(फोटो- चीनच्या हुनान प्रांतात एका प्रिटींग प्रेसमध्ये नकाशा तयार करताना कर्मचारी)
पुढच्या स्लाइडवर पाहा चीनने प्रकाशित केलेल्या नवीन नकाशाचे फोटोज