Home »International »Other Country» China Make Cyber Hacking With The Help Of The Other Countries

इतर देशांच्या मदतीने चिनी लष्कराची सायबर हेरगिरी

वृत्तसंस्था | Feb 20, 2013, 09:05 AM IST

  • इतर देशांच्या मदतीने चिनी लष्कराची सायबर हेरगिरी

वॉशिंग्टन - चिनी लष्कर इतर देशांच्या मदतीने सायबर हेरगिरी करून डाटा चोरी करण्याचे काम करू लागले आहे, असा दावा एका अमेरिकी कंपनीने केला आहे. इंटरनेट सुरक्षा फर्म मँडियांतने हा दावा केला.

एपीटी 1 : चीनच्या सायबर हेरगिरी शाखेतील एका पर्दाफाश अशा आशयाचा अहवाल मँडियांतने जाहीर केला आहे. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने (सीपीसी) सायबर हेरगिरी आणि जगभरातील संस्थेतून डाटा चोरण्यासाठी लष्कराला नियोजित पद्धतीने कामाला लावले आहे, अशी आमची माहिती असल्याचे सुरक्षा फर्मने म्हटले आहे. अहवाल 60 पानी आहे. चिनी लष्कराशी संबंधित संस्थेने 141 कंपन्यांचा डाटा चोरला आहे. त्यातील 115 अमेरिकी आहेत. त्यांच्या टार्गेटवर माहिती-तंत्रज्ञान, उद्योग पासून दूरसंचार, ऊर्जा, हवाई विभागापर्यंतचा समावेश आहे. शांघायच्या पुडाँग जिल्ह्यातून अशा प्रकारचे सायबर चोरीचे काम चालले आहे, असा दावाही फर्मकडून करण्यात आला आहे. न्यूयॉर्क टाइम्स, वॉल स्ट्रीट जर्नलनेही याच वर्षी सायबर हेरगिरी झाल्याचा आरोप केला होता. आपल्या 53 पत्रकारांच्या संगणकात घुसखोरी करण्यात आली, असे न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले होते.
* इंग्रजी येणा-या हजारो जणांचा स्टाफ
* अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्प्युटर सिक्युरिटी
* नेटवर्किंग कौशल्य
* 20 उद्योगांच्या 141 कंपन्यांमध्ये घुसखोरी
* इंग्रजीभाषिक कंपन्यांचे ब्लूप्रिंट, बिझनेस प्लॅन, प्राइसिंग डॉक्यूमेंट्स, यूजर क्रेडेंशियल्स, ई-मेल, संपर्क यादीची चोरी
* नेटवर्कमध्ये घुसखोरीनंतर 365 दिवसांचा मुक्काम, कमाल 1 हजार 764 दिवस.

Next Article

Recommended