चीन करणार अमेरिकेवर / चीन करणार अमेरिकेवर क्षेपणास्त्र हल्ला? चीनच्या निवृत्त जनरलचा खुलासा

agency

Sep 05,2011 04:24:18 PM IST

बीजिंग- चीनच्या एका निवृत्त जनरल याने खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, चीन अमेरिकेवर गुपचुप क्षेपणास्त्र हल्ला करण्याच्या तयारीत आहे. जनरल जू गुयांग्यू असे त्यांचे नाव असून विकिलिक्सने चीन-अमेरिकेबाबतचे केबल्स उघड केल्यानंतर जनरल जू यांनी हा खुलासा केला आहे विशेष. या खुलाशापूर्वी विकिलिक्सने फोडलेल्या केबल्समध्ये म्हटले होते की, अमेरिकेने गेल्या वर्षी आपल्या मित्रराष्ट्रांना चीनकडून क्षेपणास्त्र इंटरसेप्टरच्या परीक्षणांबाबत माहिती घ्या, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहा, अशी धमकी दिली होती.
अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी आस्ट्रेलिया, ब्रिटेन, कॅनडा, न्यूझीलॅंड या आपल्या मित्रराष्ट्रांना त्या-त्या अमेरिकी दूतावासामार्फत गुप्त संदेश पाठवून चीनच्या क्षेपणास्त्राच्या तयारीबाबत माहिती दिली होती. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हणजेच क्लिंटन यांनी एक संदेश पाठविला होता. त्यात क्षेपणास्त्राच्या इंटरसेप्टर लॉन्च करण्याची साइट, त्याची ठिकाणे, क्षेपणास्त्राचे मॉडेल, परीक्षणाचे कारण, तारीख व वेळ याची पूर्ण माहिती पुरवली होती. क्लिंटन यांच्या संदेशानंतर दोनच दिवसांनी चीनने इंटरसेप्टर लॉन्च केला होता.
हॉंगकॉंगमधील 'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'ने जू यांच्या हवाल्याने हे वृत्त प्रकाशित केले असून, त्यात म्हटले आहे की, चीन आजकाल 'आर्म्स कंट्रोल ऍण्ड डिस्ऑर्म्समेंट एसोसिएशन' शी जोडला गेला आहे. जू यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेने आपल्या सॅटेलॉईट उपग्रहामार्फत चीनच्या क्षेपणास्त्र स्थळाची माहिती गोळा केली आहे. मात्र क्षेपणास्त्राची संपूर्ण माहिती, त्याचे प्रकार, परीक्षण तारीख, वेळ याची माहिती ते कोणत्यातरी स्त्रोताद्वारे घेत असतील. त्यामुळे त्यांना सर्व घटनाक्रम मिळाला होता.
या वर्तमानपत्राने जू याच्या विधानाला महत्त्व देत म्हटले आहे की, जर चीन आपल्या क्षेपणास्त्राची माहिती गुप्त ठेवू शकत नाही, तर, अमेरिकेवर गुपचुप पध्दतीने ( सरप्राइज अॅटक) हल्ले कसे करु शकणार. त्यामुळेच चीन अमेरिकेवर हल्ला कदाचित करु शकत नसेल. एक मात्र खरे चीन याबाबत गंभीर विचार करीत आहे, असेच जू यांच्या वक्तव्यानुसार दिसून येते.

X
COMMENT