आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये अल्पवयीन बलात्कार्‍यास 10 वर्षे शिक्षा, आरोपी जनरलचा मुलगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - बलात्कार प्रकरणात दोषी अल्पवयीन मुलास हैडन जिल्हा न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा ठोठावली. दोषी चिनी जनरलाचा मुलगा आहे. बीजिंग येथील हॉटेलमध्ये महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी 17 वर्षीय ली तियानीसह चौघांना दोषी ठरवण्यात आले. 17 फेब्रुवारी रोजी बारमध्ये मद्य पिल्यानंतर आरोपींनी हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार यांग या महिलेने दिली. यानंतर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. लीचे वडील ली शंगजीयांग लष्करामध्ये गायक असून त्यांना जनरलचा दर्जा आहे.


(छायाचित्र : ली तियानी )