आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Mine Induustry Minister Liu Han New In Marathi

चीनचे खाण उद्योगपती हान यांना मृत्युदंडाची शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनचे खाण उद्योगपती लिउ हान यांना एका हत्येच्या प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. चीनमधील बडी आसामी व तपासविषयक माजी प्रमुख झोऊ याँगकंग यांच्याशी त्यांचे संबंध असल्याचे मानले जाते.

हुबेई न्यायालयाने 48 वर्षीय लिऊ हान व त्यांचे भाऊ लिऊ वेई यांना दोषी ठरवले आहे. माफिया पद्धतीने संघटित गुन्हेगारी व हत्या करण्याच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. एकूण 36 दोषींमध्ये या दोघांचाही समावेश होतो. झोऊ नेटवर्कशी संबंधित लोकांच्या विरोधातील भ्रष्टाचार प्रकरणामधील सर्वात कठोर कारवाईचा परिणाम म्हणून या शिक्षेकडे पाहिले जाते. लोकांना स्थानबद्ध करणे, त्यांची हत्या करण्याचा ठपका त्यांच्यावर आहे.

फोर्ब्जमध्ये 148 वा नंबर
खाण समूह सिचुआन हॅनलांग ग्रुपचे माजी प्रमुुख लिऊ यांची 2012 च्या फोर्ब्जच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत नोंद घेण्यात आली होती. ते 148 व्या स्थानी होते.