आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बीजिंग- चीनमधील मुस्लिमांच्या धार्मिक भावनेला ठेच पोहचवण्यात येत आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम लोक रोजा पकडतात. मात्र चीन सरकारने त्यावर आक्षेप घेत रोजे पकडू नयेत, असे सांगितले आहे. याबाबत चीन सरकारचे म्हणणे आहे की, आरोग्यावर याचा परिणाम होत असल्याने लोकांनी रोजा पकडू नये. मात्र याला विरोध झाला असून, मुस्लिमांना धर्मनिरपेक्ष बनविण्याचे काम चीन सरकारला महागात पडू शकते.
चीनमधील पश्चिमी प्रांत जिनजियांगमधील अनेक शहरात, जिल्ह्यात व गावांत वेबसाइटांवर एक नोटिस जारी करण्यात आली आहे. या नोटिशीत कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य, सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी यांना रोजा न पकडण्याचा आदेश देण्यात आला आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने सरकारी प्रवक्त्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सरकार लोकांना प्रोत्साहित करीत आहे की, चांगले शिक्षण घेण्यासाठी व काम करण्यासाठी व्यवस्थित व पोषक आहार घ्यावा. मात्र रोजाच्या दरम्यान, कोणालाही खाण्याबाबत जबरदस्ती करु शकत नाही. जगभऱातील मुसलमान लोक ३० दिवस रमजानच्या महिन्यात सुर्यास्तापर्यंत काहीही खात-पित नाहीत.
PHOTOS : चॅम्पियन होण्यासाठी चीन देते चिमुरड्यांना निर्दयी प्रशिक्षण
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.