Home | International | China | china, navy, ins

चीनच्या नौदलाने भारतीय जहाजाला जबरदस्तीने थांबिवले

agency | Update - Sep 01, 2011, 02:13 PM IST

चीनच्या भारत विरोधी कारवाया थांबण्याची नावे घेत नाहीत, असेच सध्या दिसून येत आहे. एका ताज्या खुलाशानुसार, मागील दोन महिन्यापूर्वी म्हणजेच जुलै महिन्यात भारतीय नौदलच्या आयएनआस या जहाजाला चीनने रोखले होते.

  • china, navy, ins

    नवी दिल्ली- चीनच्या भारत विरोधी कारवाया थांबण्याची नावे घेत नाहीत, असेच सध्या दिसून येत आहे. एका ताज्या खुलाशानुसार, मागील दोन महिन्यापूर्वी म्हणजेच जुलै महिन्यात भारतीय नौदलच्या आयएनआस या जहाजाला चीनने रोखले होते. आलेल्या बातम्यानुसार, चीनच्या नौदलाच्या एका मोठ्या जहाजाने भारताच्या आयएनएस या जहाजाला दक्षिण चीनच्या समुद्रात जबरदस्तीने थांबवून जहाजावरील सर्वांची माहिती घेतली होती. तसेच हे जहाज दक्षिण चीनच्या समुद्रात आणण्याचे कारण काय याबाबत चौकसी केली होती.
    दुसरीकडे मात्र, चीनचे जाहजे भारतीय उपखंडात खुलेआम फिरत असतात. चीन श्रीलंकेला व बांग्लादेश यांना बंदर बांधून देण्याच्या नावाखाली खुलेआम हिंदी महासागरात सक्रिय आहे. नुकतेच हिंद महासागरात चीनच्या एक जहाज टेहाळणी करताना भारताच्या नौदालाने त्याचा पाठलाग केला होता. चीन मासे पकडण्याच्या नावाखाली जहाजावर प्रयोगशाळा उभारतो व भारताच्या जवळच्या समुद्रातील आकडेवारी गोळा करत त्याचा अहवाल बनवत असतो.

Trending