आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवाचा पूर्वज माकड नव्हे, उंदरापेक्षा छोटा प्राणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - छोट्या माकडापासून विकसित होत गेलेला मानवाचा पूर्वज वास्तवात उंदरापेक्षा छोटा होता, असे नव्या अभ्यासात उघड झाले आहे. चीनच्या हुबेई प्रांतात 2003 मध्ये सापडलेल्या सर्वात प्राचीन मानवी सांगाड्याच्या अभ्यासावरून सुरुवातीचा मानव छोटा जीव असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ज्या सांगाड्याचा अभ्यास करण्यात आला तो अर्चिसेबस अचिल्स या प्रजातीशी संबंधित असल्याचे चीन, अमेरिका व फ्रान्सच्या शास्त्रज्ञांच्या संशोधन अहवालात म्हटले आहे. पृथ्वीतलावर माकडांचे अस्तित्व 5 कोटी 50 लाख वर्षांपूर्वी होते. मानवाचा हा छोटासा जीव 71 मिमी लांब व वजन 20 ते 30 ग्रॅमदरम्यान असण्याची शक्यता आहे.
सांगाड्याच्या अभ्यासावरून छोटा मानवी जीव चार पंख असणारा कीटकभक्षक होता. शरीररचनेतील पायाच्या आकारावरून मानवी जीव झाडावर चढू शकत होता व त्याच्यात उड्या मारण्याची क्षमता होती. चायनीज अकॅडमी ऑफ सायन्समधील व्हर्टब्रेट पालेनथॉलॉजी अ‍ॅँड पालेथ्रॉपोलॉजी विभागातील डॉ. नी झिजून यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करण्यात आले.

157 प्राण्यांशी तुलना
या संशोधनामुळे माणसाच्या सर्वात आधीच्या वंशजाच्या जीवनाची माहिती मिळण्यास मदत होईल, असे नी म्हणाले. 2003 मध्ये चीनच्या जिझोन शहरानजीक यांगतेझ नदी किना-यावर ‘ऑड हायब्रीड’ सांगाडा सापडला. तीन देशांतील शास्त्रज्ञांनी या सांगाड्यावर दहा वर्षे अभ्यास केला. या अभ्यासात त्यांनी 157 स्तनधारी प्राण्यांच्या 1000 शरीररचनेशी तुलना केली. त्यानंतर त्यांनी मानवाच्या छोट्याशा जिवाचा वंशवृक्ष तयार केला आहे.

त्या काळातील मनुष्यसदृश प्राणी (प्रायेमट) उष्णकटिबंधीय प्रदेशात राहत होता. नेचर जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. नवी प्रजाती विज्ञानातील ज्ञात प्रायमेटपेक्षा भिन्न आहे, असे संशोधन पथकातील सदस्य, मानववंश शास्त्रज्ञ डॉ. ख्रिस्तोफर बियर्ड यांनी सांगितले.