आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • China News In Marathi, Terrorist Group, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनमध्‍ये पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत 13 दहशतवाद्यांचा खात्मा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - चीनच्या शिजियांग प्रांतात शनिवारी दहशतवाद्यांनी एका पोलिस ठाण्यावर हल्ला केला. त्यावर पोलिसांनी धडक कारवाई करताना दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या. त्यात 13 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. स्फोटकांनी भरलेल्या वाहनातून दहशतवादी पोलिस ठाण्यात घुसले होते. आत्मघाती हल्ल्यात तीन पोलिस जखमी झाले.


शिनजिंग प्रांतात ही घटना घडली. कारगिलिक येथील सुरक्षा यंत्रणेच्या इमारतीवर हल्लेखोरांनी कार धडकवली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ हल्लेखोरांना सडेतोड उत्तर दिले. त्यात 13 हल्लेखोर ठार झाले, असे चीनमधील एका वेब पोर्टलने स्पष्ट केले. मीडियातील वृत्तात हल्लेखोरांचे वर्णन ‘दरोडेखोर’ असे करण्यात आले आहे. सरकारी वृत्त वाहिनी शिन्हुआकडून मात्र वेगळा दावा करण्यात आला. हल्लेखोरांनी कार नव्हे, तर ट्रकचा वापर केला होता व ही घटना शनिवारी सकाळी घडल्याचा दावा केला आहे. शिनजिंग गेल्या काही वर्षांपासून अशांत बनलेला आहे. येथील स्थानिक मुस्लिम समुदायाकडून सातत्याने होत असलेल्या निदर्शनांमुळे प्रांतात अस्वस्थता पाहायला मिळते.


ईटीआयएमवर संशय
इस्ट तुर्कस्तान इस्लामिक मूव्हमेंट (इटीआयएम) हा अल कायदा संघटनेचा पाठिंबा असलेला कट्टरवादी गट आहे. या गटाकडून शिनजिंग व परिसरात सातत्याने हल्ले केले जातात. पोलिस ठाण्यावर हल्लाही त्याचाच भाग असावा, असा चीन सरकारचा संशय आहे.