Home | International | China | china not supportes naxlists

नक्षलवाद्यांना चीनचा पाठिंबा नाही

वृत्तसंस्था | Update - Jun 11, 2011, 01:47 AM IST

कोणतेही सरकार हटविण्यासाठी हिंसक मार्गांचा अवलंब करण्याला पक्षाचा विरोध

  • china not supportes  naxlists

    बिजींग- भारतातील माओवादी किंवा नक्षलवादी चळवळीला कोणत्याही प्रकारे पाठिंबा अथवा सहकार्य केले जात नसल्याचा निर्वाळा चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने दिला आहे. या संघटनांशी आमचा कुठलाही संबंध नसल्याचेही पक्षाने म्हटले आहे.

    कोणतेही सरकार हटविण्यासाठी हिंसक मार्गांचा अवलंब करण्याला पक्षाचा विरोध आहे, असे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) ज्येष्ठ नेते तथा राज्यमंत्री आय. पिंग यांनी म्हटले आहे. भारतातील नक्षलवादी चळवळीबाबत विचारणा केली असता माओच्या युगात अशी क्रांती योग्य मानली जात होती, परंतु 1976 सालात माओचा मृत्यू झाला आणि ही विचारधारादेखील संपुष्टात आली, असे ते म्हणाले. समाजवाद आणि साम्यवादाच्या भविष्याबाबत ते म्हणाले की, समाजवादी आधुनिकीकरणाच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत.

Trending