आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या उलट्या बोंबा, भारताच्या चौक्यांनावर आक्षेप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - भारत-चीन सीमेवर 35 नव्या चौक्या उभारण्याच्या भारताच्या योजनेबाबत चीनने चिंता व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर चीनच्या एका ‘थिंक टँक’ने भारताचे हे पाऊल आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे. यामुळे उभय देशांत तणाव उद्भवू शकतो, असेही म्हटले गेले आहे. सरकारी वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्समध्ये सोमवारी शांघाय इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे (एसआयआयएस) तज्ज्ञ लिऊ जोंगई यांचा लेख प्रकाशित झाला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, भारताकडून नव्या चौक्या उभारण्याचा मुद्दा संवेदनशील आहे. आजघडीस सीमेवर भारताच्या 135 चौक्या आहेत.