आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China objects to defence minister ak antonys arunachal pradesh visit

अ‍ॅंटोनी अरुणाचलच्या दौ-यावर गेल्यामुळे चीन भडकला

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- भारताचे संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅंटोनी यांनी नुकताच केलेल्या अरुणाचल दौ-यामुळे चीन भडकला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी म्हटले आहे की, भारताने असे काहीही करण्यापूर्वी विचार करायला हवा. कारण यामुळे सीमावाद आणखी कठिण बनत जाईल.
चीनच्या सरकारी समाचार एजन्सीच्या म्हणण्यानुसार, परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याचे वक्तव्य अशा वेळी आले ज्यानुसार भारतीय अधिकारी कथित अरुणाचल प्रदेशात विविध कारावायात सहभागी होत आहेत. मात्र २० फेब्रुवारीला इटानगरमध्ये आयोजित केल्या अरुणाचल प्रदेशाच्या स्थापना दिनाच्या रौप्यमहोत्सवात सहभागी झाले होते. मात्र चीनने अधिकृतरीत्या अ‍ॅंटोनी यांचे नाव घेतले नसले तरी रोख त्यांच्याच दिशेने होता, असे दिसून येत आहे.
अरुणाचल प्रदेश हा भाग आपला असल्याचे चीनचे म्हणणे आहे. याआधी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनाही अरुणाचल प्रदेश दौ-याला चीनने विरोध केला होता.
भारत-चीन सीमा प्रश्नावर काथ्याकूट, चीनचा आक्रमक पवित्रा कायम