आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन बनवणार पाण्‍यावर तरंगणारे सुंदर शहर, जिथे असेल एंटरटेनमेंट कॉम्प्लेक्स, हॉटेल्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्‍ये लवकरच पाण्‍यावर तरंगणा-या शहराची निर्मिती केली जाणार आहे. फ्युचरिस्टिक फ्लोटिंग सिटीचे डिझाइन तयार करण्यात येणार आहे. यात हॉलिवूड सायन्स फ‍िक्शनची झलक पाहावयास मिळणार आहे. अ‍ॅमेझिंग सिटीचे ड‍िझाइन लंडन येथील टीडिसाइजेनर्स या आर्किटेक्चर कंपनीचे असणार आहे. प्रोजेक्टच्या सपोर्टसाठी विविध लोकांशी बोलणी चालू आहे. चीनमधील चायना ट्रान्सपोर्ट गुंतवणूक प्रस्ताव तयार करण्‍याचा विचार करत आहे. पुढील वर्षापासून छोट्या प्रमाणावर काम सुरू करण्‍यात येईल, असे प्रोजेक्टचे प्रमुख स्लोवोमिर सिस्का यांनी सांगितले. त्याची निर्मिती चीनची बांधकाम कंपनी सीसीसीसी करणार आहे.

शॉपिंग सेंटर ही असेल
फ्लोटिंग सिटी पाण्‍यावर आणि पाण्याच्या आत खोलवर अशी बनेल. त्यात रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि एंटरटेनमेंट कॉम्प्लेक्स असतील. तरंगणा-या शहरात लक्झरी होटल्‍स, रेस्तरॉं आणि शॉप्सही असेल.
या असतील सुविधा
हा इको-फ्रेंडली प्रोजेक्ट ब-याच प्रमाणात स्वयंपूर्ण असेल. येथे फूड प्रोडक्शन, पॉवर जनरेशन आणि वेस्ट मॅनेजमेंट सिस्टिमची सोय असेल. तरंगणा-या शहरात इलेक्ट्रीक आणि झीरो कार्बन उत्सर्जनवाली वाहने वाहुतकीसाठी वापरली जातील.

ट्रान्सपोर्ट यॉट आणि सबमरिन वाहतील सामान
तरंगणा-या शहराच्या बाहेर सामान धुणे हे एक आव्हान ठरणार आहे. मात्र अंडरवॉटर कॅनॉलमधील ट्रान्सपोर्ट यॉट आणि सबमरीन हे काम सोपे करेल. शहराच्या मधोमध असलेल्या हार्बर शॉपिंग आणि एंटरटेनमेंट डिस्ट्रिक्ट्सशी जोडले असणार आहे. त्याचा वापर क‍मर्शियल सबमरीनच्या पार्किंगसाठी सोयीचे होईल. त्याचे स्ट्रक्चर हे सहाभूजाचे असेल. ते मॉड्यूलला जोडून बनवले जाईल. त्यात अंडरवॉटर टनल रोड आणि पादचारी रस्त्यांचे नेटवर्क बनवले जातील.

पुढील छायाचित्रांमध्‍ये पाहा तरंगणारे शहर.....