आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Plans For North Korean Regime Collapse Leaked

काकांना संपवणारा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम संकटात, जपानी माध्‍यमांचा दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग/ टोकिओ - उत्तर कोरिया सरकार आणि त्याचे हुकूमशहा किम जोग ऊनवर कधीही संकट कोसळू शकते. वाइट प्रसंगी उत्तर कोरिया प्रशासनाच्या पाठीमागे चीन उभा राहिल आणि त्यासाठी तातडीचे नियोजन करण्‍यात येत आहे, असे चीन सरकारने सांगितले आहे.पिपल्स लिबरेशन आर्मीने उत्तर कोरियातील आणीबाणीतील स्थिती हाताळण्‍याकरिता नियोजन केले आहे, असे जपानी प्रसारमाध्‍यमात उघड झालेल्या गुप्त दस्ताऐवजांनी स्पष्‍ट झाले आहे. उत्तर कोरियातील सत्तापालट आणि हुकूमशहा किम जोंग ऊन यांचा जीव धोक्यात असल्याने चीनी सैनिक सर्व अधिकार आपल्या नियंत्रणाखाली घेणार आहे.
हे थोडे की काय चीन स्वत: निर्वासितांसाठी कॅम्प उघडणार आहे. यात विस्थापित नागरिकांना ठेवले जाणार आहे आणि सीमेवर पहारा ठेवला जाईल. हुकूमशहाबरोबर असलेले त्याची विश्‍वस्त, पक्ष कार्यकर्ते आणि कोरियन लष्‍करप्रमुखाला आश्रय देण्‍यात येईल, असे पीपल्स लिबरेशन आर्मीचे व्युहरचनाकारांचे नियोजन आहे. चीन हा उत्तर कोर‍ियाचा सर्वात मोठा सहकारी राष्‍ट्र आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, कसे कार्य असेल चीनी सेनेचे.....