आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनची धोकादायक योजना; चंद्रावर उभारणार क्षेपणास्‍त्र तळ, पृथ्‍वीवर करणार मारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनने चंद्रमोहिमेद्वारे एक धोकादायक योजना आखली आहे. चीनने थेट चंद्रावर क्षेपणास्‍त्र तळ उभारण्‍याची योजना आखली असून चीनच्‍याच एका शास्‍त्रज्ञाने हा दावा केला आहे. चंद्रावरुन पृ‍थ्‍वीवरील शत्रूंना चीन लक्ष्‍य करणार आहे.

चीनच्‍या 'नॅशनल स्‍पेस ऍडमिनिस्‍टेशन ल्‍युनार एक्‍सप्‍लोरेशन प्रोग्राम सेंटर'च्‍या एका तज्‍ज्ञाने सांगितले, की चीनभविष्‍यात लष्‍करी तळ म्‍हणून चंद्राचा वापर करु शकतो. पृथ्‍वीवर क्षेपणास्‍त्रांचा मारा करण्‍यासाठी या तळाचा वापर करण्‍यात येईल. ही योजना 2050 पर्यंत मूर्त स्‍वरुप घेईल. बिजींग चायना टाईम्‍सनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सध्‍या चीनमध्‍ये याबाबत बरीच चर्चा आहे.

या तज्‍ज्ञाने सांगितले, की पृथ्‍वीच्‍या नैसर्गिक उपग्रहाला एका मोठ्या शस्‍त्रामध्‍ये परावर्तित करणे शक्‍य आहे. चीनच्‍या या योजनेची तुलना स्‍टार वॉर चित्रपटांच्‍या मालिकेतील डेथ स्‍टारसोबत करण्‍यात आली आहे. लष्‍करी तळ उभारण्‍याशिवाय अनेक धोकादायक अस्‍त्रांच्‍या चाचणीसाठीही चीन चंद्राचा वापर करुन शकतो. तसेच लांब पल्‍ल्‍याचे अंतराळ यानही सोडण्‍यात येतील.

सविस्‍तर बातमी वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...