आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Plans Railway Link To India Border By 2020 Report

अरूणाचल प्रदेशाजवळ येणार चीनचा रेल्वे मार्ग; चीनने आखली योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - भारताचा शेजारी देश चीन लवकरच तिबेटमध्ये एका नवीन रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्याच्या विचारात आहे. हा रेल्वे मार्ग भारताच्या अरूणाचल प्रदेशच्या सीमेपर्यंत पोहोचणार आहे. एवढेच नाही तर सिक्कीमजवळ असलेल्या रेल्वे मार्गही येत्या महिन्यापासून वापरात येईल. या प्रकल्पामुळे चीन सैन्याला दूरवरील क्षेत्रात जाता येईल, तसेच राजकारणात महत्त्वाचा विषय असलेल्या हिमालय क्षेत्रामध्ये ये-जा करण्यास मदत मिळेल.
चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबस टाईम्सच्या पहिल्या पानावर छापलेल्या अहवालानुसार, "स्काय रेल्वे ल्हासा ते दक्षिण तिबेट दरम्यान चालेल. तिबेटची राजधानी ल्हासाला भरताच्या सिक्कीम सीमेसोबतच नेपाळ आणि भूटानच्या शीगेज रेल्वेशी जोडण्यात येईल. सध्या याबद्दल संशोधन सुरू आहे आणि पुढील महिन्यात या संदर्भात काम सुरू होईल. तसेच ल्हासाच्या नियिंगचीपर्यंत रेल्वे नेण्यासंदर्भातही लवकरच काम सुरू होण्याची शक्यता आहे असेही या अहवालात म्हटले आहे.
नियिंगची हे ठिकाण अरुणाचलप्रदेश जवळ आहे. अहवालानुसार, 2020 पर्यंतच्या रेल्वे विस्तार कार्यक्रमात चीन नेपाळ, भुटान आणि भारताशी जोडला जाईल असे सांगण्यात आले आहे.