आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyts Know The Type And Importance Of Rudraksh, These Things Are Written In Shivmahapuran

हे पुष्‍प महादेवाला का अर्पण केले जात नाही ? जाणून घ्‍या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व देवामध्‍ये श्रेष्‍ठ देव म्‍हणून महादेवाला पूजले जाते. परंतु आपल्‍याला माहित आहे का ? के‍तकीचे फुल महादेवाला अर्पण केले जात नाही. या संदर्भातील एक कथा पुराणात सांगण्‍यात आली आहे.
काय आहे ही कथा ?
एकदा ब्रह्मदेव आणि भगवान विष्‍णु दोघांपैकी श्रेष्‍ठ कोण यावरूण वाद सुरू झाला. मी या सृष्‍टीचा निर्माता असल्‍यामुळे मीच श्रेष्‍ठ ठरतो, असा दावा ब्रह्मदेवाने केला. भगवान विष्‍णु म्‍हणाले, ब्रह्मदेव तुम्‍ही जरी या सृष्‍टीचे निर्माते असले तरी मी मात्र सृष्‍टीचा पालनकर्ता आहे. या दोघांचे वाद सुरू असताना अचानक ज्‍योतिर्मय लिंग प्रकट झाले. ज्‍योतिर्मय लिंग प्रकट झाल्‍यानंतर सर्व देवतांनी विचार करून एक मताने निर्णय घेतला. तुमच्‍या दोघांपैकी जो या ज्‍योतिर्मय लिंगाचे मुळ शोधून काढेल तो खरा श्रेष्‍ठ !
ज्‍योतिर्मयचे लिंगाचे मुळ शोधून काढण्‍यासाठी दोघेही दोन विरूध्‍द दिशेला निघाले. परंतु ज्‍योतिर्मयचे लिंगाचे मुळ दोन्‍ही देवांना सापडले नाही, रिकाम्‍या हाताने विष्‍णू आणि बृह्मदेव परत आले. शोध तर दोघांनाही लागलेला नव्‍हता, परंतु आपण श्रेष्‍ठ आहोत हे सिध्‍द झाले पाहिजे यासाठी ब्रह्मदेव खोटे बोलले आणि म्‍हणाले मी या ज्‍योतिर्मय लिंगाचे मुळ शोधून काढले आहे. याचा पूरावा म्‍हणून केतकीचे फुल ब्रह्मदेवानी सोबत आणले. ब्रह्मदेव खोटेबोलतात हे लक्षात आल्‍यानंतर महादेव प्रकट झाले आणि त्‍यांनी ब्रह्मदेवाची निंदा केली.
यावेळी दोघांनीही महादेवाची स्‍‍तु‍ती केली. यावेळी भगवान महादेव म्‍हणाले की, मी या सृष्‍टीचा खरा निर्माता आहे. मीच ब्रह्मदेवाची आणि भगवान विष्‍णुची निर्मिती केली आहे. ब्रह्मदेवाची बाजू घेण्‍यासाठी आलेल्‍या केतकीच्‍या फुलाने खोटी साक्ष दिल्‍यामुळे महादेवाने फुलाला शिक्षा दिली. ती शिक्षा म्‍हणजे केतकीचे फुल माझ्या पूजेसाठी कधीच वापरण्‍यात येणार नाही. तेंव्‍हा पासून केतकीचे फुल हे महादेवाच्‍या पूजेमध्‍ये अर्पण केले जात नाही.