आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Refutes Narendra Modi's 'expansionist Mindset' Remark News In Marathi

जमीन बळकावण्यासाठी कधीही युद्ध केले नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - कोणत्याही देशाच्या इंचभर जमिनीवर कब्जा करण्यासाठी आम्ही युद्ध केले नसल्याचा दावा चीनने केला आहे. भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी रविवारी अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित जाहीर सभेत चीनने विस्तारवादी धोरणावर आळा आणण्याची मागणी केली होती. यानंतर चीनकडून प्रतिक्रिया आली आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग म्हणाल्या, तुम्ही चीनच्या विस्तारवादी धोरणावर बोलला आहात. मात्र, आम्ही दुसर्‍या देशाची इंचभर जमीन ताब्यात घेण्यासाठी कधी युद्ध केले नाही. सीमेवर दीर्घकाळापासून संघर्ष उडाला नाही. त्यामुळे शांतता कायम ठेवण्याची क्षमता आहे. ही बाब दोन्ही देशांच्या विकासासाठी चांगली आहे. मोदी यांनी आपल्या भाषणात अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो राहील, असे म्हटले होते. कोणतीही शक्ती अरुणाचल हिरावून घेऊ शकत नाही. यावर चीनच्या प्रवक्त्या म्हणाल्या, पूर्व सीमेवरील आमची स्थिती स्पष्ट आहे. दोन्ही देशांमध्ये सीमेबाबत काही वाद आहेत. चर्चेद्वारे त्यातून मार्ग काढण्याची आमची इच्छा आहे. चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेट असल्याचे सांगत आपला दावा सांगत असतो.