आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल नेटवर्किंगवरील बंदी चीनने उठवली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनने फेसबुक, ट्विटरवरची बंदी सध्या उठवली आहे. आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन (अपेक)च्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही बंदी उठवण्यात आली आहे. परिषदेला उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींना फेसबुक, ट्विटर, यूट्यूब अ‍ॅक्सेस देण्यात आला आहे.

चीन सरकारने या सर्व संकेतस्थळांना देशांत सक्तीची बंदी घातलेली आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी ही सुविधा चीनने प्रथमच उपलब्ध करून दिली आहे. १० नोव्हेंबरपासून बीजिंग येथे ही परिषद सुरू होत आहे. चीनमध्ये दलाई लामा यांच्या संबंधित सर्व गुगल सर्चवरही बंदी आहे. मात्र परिषदेदरम्यान ही सर्च टर्म खुली करण्यात आली आहे.