आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Shows Off New J 31 Stealth Fighter Aircraft In Airshow

चीनने प्रथमच जगासमोर आणले स्टील्थ फायटर जेट, पाक असेल पहिला ग्राहक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनच्या झुहाईमध्‍ये सुरु असलेल्या 'एअर शो'त पहिल्यांदा स्टील्थ फायटर जेट 'जे-31' चा समावेश करण्‍यात आला आहे. जे-31 चीनचा दुसरा स्वदेशी स्टील्थ फायटर जेट आहे. यास 'फाल्कन ईगल' असे नाव देण्‍यात आले आहे.

पाकिस्तान असू शकतो पहिला ग्राहक
यूएस नेव्हल वॉर कॉलेजचे साहाय्यक प्राध्‍यापक अँड्रयू एरिक्सन म्हणतात, की चीन वेगाने संरक्षण उत्पादनाच्या बाजारपेठेत आपले अधिराज्य प्रस्थापित करण्‍यास उत्सुक आहे. जे-31 चा पहिला ग्राहक हा पाकिस्तान असू शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. एव्हिक कंपनी पाकिस्तानच्या मदतीने एक नवे फायटर जेट'एफसी-1' तयार करत आहे. चीनचे शेजारील देशांबरोबर तणावपूर्ण संबंध असताना फायटर जेटचे प्रदर्शन भरवण्‍यात आले आहे.

अमेरिकेच्या एफ -35 ला उत्तर असेल जे-31
दोन शक्तिशाली इंजिन असलेल्या जे-31 एअर शोमध्‍ये ठेवून चीनला आपली ताकद जगाला दाखवायची आहे. चीनला असे वाटते, की जे-31 हा अमेरिकेच्या एफ-35 ला आव्हान देऊ शकते. लवकरच या फायटर जेटची मागणी सुरु होऊ शकते. जेटला प्रमोशनसाठी एअर शोमध्‍ये उतरवले नसल्याचे चीनची विमान कंपनी एव्हिएशन इंडस्‍ट्री कॉर्प ऑफ चायनाने सांगितले आहे. येणा-या वर्षात जे-31 संरक्षण बाजारपेठेत पहिली पसंती मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

संरक्षण खर्चात वाढ
चीन प्रत्येक वर्षी संरक्षण खर्चात प्रचंड वाढ करत आहे. 2014 च्या संरक्षण खर्चात 12 टक्क्यांनी वाढ करण्‍यात आली आहे.

पुढील स्लाइडवर पाहा एअर शोची छायाचित्रे....