आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Spots Suspicious White Objects, US Navy Sends Black Box Locator

\'MH 370\' कोसळले हिंद‍ी महासागरात; कोणीच जिवंत नाही; मलेशियाच्या पंतप्रधानांनी केले जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ/ क्वालालंपूर- गेल्या दोन आठवड्यांपासून बेपत्ता असलेले मलेशियन एअरलाइन्सचे 'एमएच 370' विमान दक्षिण हिंदी महासागरात कोसळल्याचे मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी आज (सोमवार) सायंकाळी जाहीर केले आहे. विमानातील एकही प्रवाशी जिवंत नाही, असा 'एसएमएस' प्रवाशांच्या नातेवाईकांना मलेशिया एअरलाईन्सतर्फे पाठविण्यात आला आहे. शोध मोहिम थांबविण्यात अवाल्याचेही रझाक यांनी सांगितले.

नजीब रझाक यांनी सोमवारी संध्याकाळी बेपत्ता विमानाचा दक्षिण हिंदी महासागरात कोसळल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. 'एमएच 370 या विमान हिंदी महासागरात कोसळले. त्यातील 239 प्रवाशांपैकी कोणीही जिवंत नाही. हे सांगताना मला खूप दु:ख होत आहे'. अशी माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

ब्रिटनच्या एका सॅटेलाईटवरुन मिळालेल्या छायाचित्राच्या आधारे आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो असल्याचेही रझाक यांनी यावेळी स्पष्ट केले.

आठ मार्च रोजी 239 प्रवासी व कर्मचा-यांना घेऊन एमएच 370 हे विमान क्वालालांपूरहून बिजिंगच्या दिशेने निघाले होते. परंतु उड्डाण घेतल्यानंतर तासाभरानंतर ते अचानक बेपत्ता झाले होेते. या विमानात भारतातील पाच प्रवाशांचा समावेश होता.

पुढील स्लाइडवर वाचा, बेपत्ता विमानाचा लवकर शोध लागावा म्हणून सेपांग शहरातील नागरिकांची सायकल रॅलीद्वारे प्रार्थना...