आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी रेडिओकडून भारतात तामिळी एफएम केंद्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिजींग - चायना रेडिओ इंटरनॅशनलकडून (सीआरआय) भारतात तामिळी एफएम केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
सीआरआयच्या तामिळ सेवेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चिनी रेडिओने चेन्नई येथे एफएम केंद्र सुरू करण्यात आले आहेत. एफएमच्या क्षेत्रात आम्ही पाऊल ठेवले आहे. सीआरआयची ऑगस्ट 1963 मध्ये सुरुवात झाली होती. तामिळनाडूमध्ये आम्ही अगोदरच एसडब्ल्यू चालवतो.


राज्यातील एफएम केंद्रांसोबत वितरणासंबंधी आमची बोलणी सुरू आहेत, असे चाय जन अका वॅनी यांनी सांगितले. सीआरआयकडून हिंदी, बंगाली, उर्दू भाषेतून देखील सेवा दिली जाते. 2009 पासून सीआरआय मोबाइल सेवा सुरू आहे. सीआरआयची स्थापना 3 डिसेंबर 1941 मध्ये झाली होती. सध्या रेडिओमार्फत जगभरातील एकूण 63 भाषांतून सेवा दिली जाते.