आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमधील चक्रीवादळात 9 ठार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - ईशान्य चीनमध्ये सोमवारी आलेल्या चक्रीवादळात नऊ ठार, तर चार जण जखमी झाले. वादळामुळे या भागातील रेल्वेसेवा विस्कळीत झाली असून वादळामुळे सुमारे 20 लाख नागरिकांना फटका बसला आहे. 1 लाख 10 हजार नागरिक बेघर झाले आहेत. डॅमरी चक्रीवादळ शनिवारी लिऑनिंग प्रांतात धडकले होते. या वादळामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे तसेच वाहतूक व्यवस्था काही काळासाठी ठप्प होती. शिउयान शहरात सहा जण ठार झाले. या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची यंत्रणाही बंद पडली आहे. शिहे नदीजवळील बोगद्यात बांधकामाच्या ठिकाणी 300 मजूर अडकले आहेत. हुबेई भागातील पूरस्थिती गंभीर आहे. घटनेनंतर बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.