आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावर्षी युद्धासाठी सज्‍ज व्‍हाः चीनचे सैन्‍याला निर्देश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिजिंग- वादग्रस्‍त बेटांवरुन चीन आणि जपानमध्‍ये तणाव प्रचंड वाढत आहे. त्‍यावरुन चीनने यावर्षी युद्धाची तयारी सुरु केली असून सैन्‍याला लढण्‍यासाठी तयार राहण्‍याचे आदेश दिले आहेत. चीनच्‍या सरकारी प्रसारमाध्‍यमांनी यासंदर्भात खुलासा केला आहे.

चीन आणि जपानमध्‍ये सेनकाकू बेटांवरुन प्रचंड वाद आहे. हा वाद युद्धापर्यंत येऊन ठेपला आहे. चीनच्‍या पीपल्‍स लिबरेशन आर्मी आणि पीपल्‍स आर्म्‍ड पोलिस दलाला युद्धासाठी तयारी सुरु करण्‍याचे आदेश देण्‍यात ाअले आहेत. माध्‍यमांनी प्रकाशित केलेल्‍या अहवालानुसार, सैन्‍याने प्रत्‍यक्ष युद्धाप्रमाणे युद्धाभ्‍यास करण्‍याचे निर्देश देण्‍यात आले होते. या अहवालात वादग्रस्‍त बेटांचा उल्‍लेख करण्‍यात आलेला नाही. परंतु, गेल्‍या वर्षीच्‍या अहवालात सैन्‍याला युद्धासाठी तयार राहण्‍याचे निर्देश देण्‍यात आलेले नव्‍हते. त्‍यामुळे चीन-जपानमध्‍ये यावर्षी युद्ध भडकू शकते.

दोन्‍ही देशांमध्‍ये आतापर्यंत तीन वेळा युद्घ झाले आहे. दुस-या महायुद्धातही हे देश भिडले होते. जपानने दक्षिण चीनच्‍या समुद्रात 3 बेट खरेदी केले होते. या बेटांवर चीनने दावा केला आहे. त्‍यावरुन वाद भडकला आहे. दोन्‍ही देशांचे लढाऊ विमाने या बेटांजवळ घिरट्या मारत असतात. परंतु, आतापर्यंत संघर्ष झालेला नाही.