Home | International | China | china-threatens-india

भारताची दादागिरी चालू देणार नाही, चीनी दैनिकातून भारतावर हल्ला

वृत्तसंस्था | Update - Jun 15, 2011, 12:54 PM IST

चीनी कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र 'पीपल्स डेली' ने पुन्हा एकदा भारतावर गरळ ओकली आहे.

 • china-threatens-india

  नवी दिल्ली - चीनी कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र 'पीपल्स डेली' ने पुन्हा एकदा भारतावर गरळ ओकली आहे. या वृत्तपत्राच्या संपादकीय मध्ये भारत हा अनेक वर्ष ब्रिटीशांच्या अंमलाखाली होता आणि त्यामुळे त्यांची मानसिकताही आशियायी देशांवर दबाव टाकण्याची असल्याचे म्हटले आहे.
  नुकतेच चीनने ब्रम्हपुत्रा नदीच्या प्रवाहाची दिशा बदलण्यावरुन भारताने चिंता व्यक्त केली होती. त्यावर मंगळवारी चीनेने या गोष्टीचा इन्कार केला होता. मात्र बुधवारी परत एकदा पीपल्स डेली मधून चीनने भारतावर हल्ला केला आहे.  अरुणाच प्रदेशचे अर्थमंत्री केलीखो पुल यांनी मुख्यमंत्री जोरबाम गामलिन यांच्या उपस्थितीत योजना आयोगाच्या बैठकीत केंद्र सरकारला सावध केले होते की, अरुणाचल प्रदेशात कारगील सारखी स्थिती निर्माण झाली आहे. चीनने त्यांची सीमा रेषा ओलांडून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी अनेक ठिकाणा आपली चिन्ह रंगवून अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भाग असल्याचे भासविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

  चीनी दैनिकाच्या संपादकीय मध्ये म्हटले आहे की, ब्रिटीशांच्या अंमलाखाली भारत, पाकिस्तान, म्यानमार, बांग्लादेश आणि नेपाळ हे देश होते. ब्रिटीशांनंतर या आशियायी देशांमध्ये भारत हा शक्तीशाली देश आहे तेव्हा भारताला या देशांवर आपले प्रभुत्व ठेवण्याची खुमखुमी असणे सहाजीक आहे. या संपादकीय मध्ये पुढे म्हटले आहे की, भारताने सीमा विवादाबाबद चीनच्या भूमिकेला कायम नजरेआड केले आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी भारताला दुय्यम भूमिका घेणारा देश कधीच बनायचे नाही असे म्हटले होते. याचा भारतीयांना विसर पडत चालला आहे. भारताला एक तर महाशक्ती म्हणून समोर यावे लागेल किंवा लुप्त व्हावे लागले. या दैनिकाचे म्हणणे आहे की, भारतीय महाशक्ती बनण्याचे स्वप्न पाहात आहेत. मात्र ते अविवेकी आहे.  या संपादकीय मध्ये असेही म्हटले आहे की, चीन आणि भारताच्या शेजारी राष्ट्र भारताच्या परराष्ट्रधोरणा बद्दल जराही समाधान नाही. दुरुन मित्रत्वाचा हात देणार भारत जवळगेल्यावर हल्ला करत आहे. भारतालाजर महाशक्ती बनायचे असेल तर शेजारी राष्ट्रांसोबतच्या संबंधावर लक्ष ठेवावे लागणार आहे. आपला एककल्लीपणा सोडावा लागणार आहे. भारताने चीन आणि पाकिस्तान यांच्या सोबतचा तणाव संपवल्यास त्यांचा महाशक्तीचा महामार्ग मोकळा होणार असल्याचे म्हटले आहे.  आपले मत -  काय भारताने या चीनच्या धमकीला उत्तर दिले पाहिजे ? की, भारताने केवळ औपचारीक विरोध आणि चीनच्या आश्वासनावंरच विसंबून राहिले पाहिजे ? या सगळ्या मुद्यावर तुम्हा तुमचे मत इधे नोंदवू शकता. मात्र कोणत्याही आक्षेपार्ह मतांसाठी वाचक स्वत: जबाबदार राहतील.


Trending