आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Town Places Big Achievment In Indutrial Sector

चीनमधील लहान शहरांची औद्योगिक क्षेत्रात मोठी झेप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुन्शान- चीनमधील लहान शहरांतून औद्योगिक भरभराट वाढू लागली असून लॅपटॉपपासून नेकटायपर्यंत विविध वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणा-या शहरांची संख्या वाढली आहे.
कुन्शान हे चीनमधील एक लहान शहर. लॅपटॉपच्या जगातील एकूण उत्पादनापैकी मोठा वाटा या शहरातून निर्माण होतो. त्याच्या शेजारी असलेले शेंगझोऊमध्येही उद्योगांची संख्या वाढली आहे. यिवू शहर हे जगातील सर्वात मोठी उत्पादक बाजारपेठ आहे.
चीनमधील कारखानदारी मोठ्या प्रमाणात बीजिंग या राजधानीच्या शहराशी संबंधित आहे; परंतु गेल्या काही वर्षांत चीनमधील लहान शहरांतून वाढणारे उद्योग मोठ्या शहरांतील उद्योगांशी स्पर्धा करू लागले आहेत. शांघाय, गाँगझोऊ ही शहरे देशाच्या झपाट्याने विकसित होणाºया औद्योगिक शहरांची उदाहरणे ठरतात. कुन्शानमध्ये लॅपटॉपबरोबरच गुड बेबी नावाची लहान मुलांना आवडणारी खेळण्यातील कारची निर्मिती होते.
देशाची आर्थिक राजधानी शांघायमध्ये आता अत्याधुनिक उत्पादने पाहायला मिळू लागली आहेत. नवीन तंत्रज्ञानावर आधारित उद्योग येथे आहेत. सॉफ्टवेअर, संगणक, नेटवर्क डिव्हायसेस, टेलिकम्युनिकेशन्स याच्याशी संबंधित उत्पादने येथे उत्पादित होतात. गारमेंट्स, इलेक्ट्रिकल, किचन अ‍ॅप्लायन्सेस, यंत्रे, मोटर्स, टाय आदी उत्पादने येथे निर्माण होतात, असे सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे सचिव जिन झाई यांनी सांगितले. नेकटायच्या उत्पादनाबद्दल शहराला इंटरनॅशनल नेकटाय सिटी ऑफ द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी असा आंतरराष्ट्रीय गौरव मिळालेला आहे.
बाबी नावाची कंपनी रेशमापासून तयार केलेल्या टायची निर्यात अमेरिका, युरोप, जपानमध्ये करते. याच शहरातून किचन अ‍ॅप्लायन्सेसच्या 5.5 दशलक्ष सेट्सचे उत्पादन केले जाते. यिवू शहर अलीकडेच मीडियातून झळकले होते. सुमारे दोन लाख उद्योग येथे आहेत, असे उपमहापौर टाओ टाओ यांनी सांगितले. यिवूमधील फॅन्सी उत्पादने भारतात निर्यात केली जातात. या शहराचा 215 देशांसोबत करार आहे. या ठिकाणी अनेक भारतीय आहेत.
कुन्शानचे महत्त्व : 7 लाख 20 हजार लोकसंख्येच्या कुन्शान या शहराची कथा प्रेरणा देणारी आहे. 930 चौरस किलोमीटर एवढे शहराचे क्षेत्रफळ. या शहरातील उद्योग जागतिक पातळीवर ओळखले जाऊ लागले आहेत. त्यामागे लॅपटॉपची निर्मिती हे कारण ठरले. कारण येथे 88 दशलक्ष लॅपटॉपची निर्मिती होते. 2010 मधील ही संख्या आहे. यातील पन्नास टक्के लॅपटॉपचा देशांतर्गत पुरवठा केला जातो.
40- टक्के एवढ्या लॅपटॉपची निर्मिती एकट्या कुन्शान शहरातील कंपन्यांतून होते. हे जागतिक पातळीवर हे प्रमाण सर्वाधिक आहे.
80 -टक्के टायचे उत्पादन शेंगझूमध्ये केले जाते. हे प्रमाण जगाच्या एकूण उत्पादनापैकी 40 टक्के एवढे आहे.