आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीन हिंसाचार : मृतांचा आकडा 50 वर, दंगलखोरांवर पोलिसांनी झाडल्या गोळ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - हिंसाचारानंतर रस्त्यावर असे मृतदेह पडलेले होते.
बीजिंग - चीनच्या शिनजियांग प्रांतात उसळलेल्या धार्मिक दंगलींनंतर चीनच्या प्रशासनाने सांगितलेल्या मृतांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात चीनच्या पश्चिम भागात दंगल उसळून झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी गोळीबारही केला होता.

सरकारच्या नियंत्रणात असणा-या स्थानिक माध्यमाच्या वृत्तानुसार या हिंसाचारात 50 जण ठार झाले आहेत. त्यात 40 दंगेखोरांचा समावेश आहे. पोलिसांचा गोळीबार आणि स्फोटांमध्ये या सर्वांचा मृत्यू झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
पोलिसांनी अत्यंत आक्रमक पाऊल उचलल्याचे या बातमीत म्हटले आहे. मात्र, पोलिसांच्या गोळीबारात नेमके किती जण ठार झाले, याचा नेमका आकडा देण्यात आलेला नाही.

या संपूर्ण घटनेत 50 नागरिक जखमीही झाले आहेत. रविवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटात ते जखमी झालेत. तो दहशतवादी हल्ला होता, असे पोलिस म्हणाले. दोन पोलिस ठाणी एक दुकान आणि बाजारात हे बॉम्बस्फोट करण्यात आले होते. या बॉम्ब हल्ल्यांच्या प्राथमिक संशयिताला गोळ्या घालून ठार केल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
सोमवारी माध्यमांनी केवळ दोन जण ठार झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर एवढे दिवस कोणतीही माहिती का देण्यात आली नाही, हे स्पष्ट झालेले नाही. गोपनीय माहिती असल्याचे कारण पुढे करत कोणीही या प्रकरणी बोलायलाही तयार नाही.

प्राध्यापक इलहम तोहती यांच्यावर फुटीरतावादाचा आरोप सिद्ध होऊन त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याच्या दोन दिवस अगोदरच हा प्रकार घडला आहे. चीनच्या सरकारने या घटनेसाठी फुटीरतावादीच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने विविध पावले उचलण्यात आली आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा या घटनेनंतरचे फोटो...