आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये फोक्सवॅगन 3.85 लाख गाड्या माघारी घेणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शांघाय- जर्मनीची कार कंपनी फोक्सवॅगन गिअर बॉक्समधील बिघाडामुळे चीनमधील 3 लाख 85 हजार कार माघारी घेणार आहे. प्रसारमाध्यमांमध्ये कारवर टीका करण्यात आल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला.


इलेक्ट्रॉनिक बिघाडामुळे कार चालवताना वीज यंत्रणा बंद पडू शकते, असे कंपनीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. एखाद्या दुस-या प्रकरणात इलेक्ट्रॉनिक यंत्रणेतील बिघाड किंवा गिअर बॉक्समध्ये इंधनाचा कमी दाब पडल्यामुळे वीज खंडित होऊ शकते. मात्र, त्यामुळे स्टेअरिंग किंवा ब्रेक लागण्यात अडचण येत नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. ऑडी एथ्री, मॅगोटन आणि पसाट या मॉडेल्सच्या कारमध्ये बिघाड आढळून आला आहे. यानंतर चीनच्या गुणवत्ता देखरेख विभागाने शनिवारी कार माघारी घेण्याचे आदेश दिले. डिसेंबर 2008 ते या महिन्याच्या सुरुवातीपर्यंतच्या कार परत घेण्यात येणार आहेत. गिअर बॉक्सच्या बिघाडास कारणीभूत ठरलेले घटक काढून टाकण्यात येणार आहेत. चीनमधील एका टीव्ही कार्यक्रमात फोक्सवॅगनने काही मॉडेल्समध्ये कमी दर्जाचा गिअर बॉक्स वापरल्यामुळे अपघात होत असल्याचा आरोप केला होता.