आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China's Astronauts Return To Earth From Longest Manned Space Mission

चिनी अंतराळवीर पृथ्वीवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - अंतराळ स्थानकातील 14 दिवसांच्या वास्तव्यानंतर तीन अंतराळवीरांचे चिनी पथक बुधवारी पृथ्वीवर परतले. अंतराळवीरांनी चीनच्या प्रस्तावित प्रयोगशाळेची शक्यता अभ्यासली.
शेनझोऊ - 10 अंतराळयान मंगोलियाच्या गोबी वाळवंटात सकाळी उतरले. यानाच्या पुन:प्रवेशाचे थेट प्रक्षेपण 15 मिनिटे दाखवण्यात आले. चीनच्या अंतराळ मोहिमेचे प्रमुख झांग योझिया यांनी शेनझोऊ-10 मोहीम यशस्वी झाल्याचे जाहीर केले. तीन अंतराळवीर सुरक्षितरीत्या उतरले असून त्यांनी यानाचे पुन:प्रवेश मॉडेल सकाळी सोडल्याची माहिती त्यांनी दिली. शेनझोऊ - 10 यानात चीनची दुसरी महिला अंतराळवीर वांग यापिंग मिशन कमांडर नी हैशेन व झांग झियागॉन यांच्यासोबत गेली होती. वांग हिने अंतराळातून विद्यार्थ्यांना 40 मिनिटे व्याख्यान दिले होते.
शेनझोऊ-10 ही चीनची पाचवी सर्वात मोठी मानवी अंतराळ मोहीम होती. शेनझोऊ - 11 जून रोजी अंतराळात झेपावले होते. चिनी अंतराळवीर गेल्या वेळी 13 दिवसांच्या मोहिमेवर गेले होते. चीन 2020 पर्यंत अंतराळात कायमस्वरूपी प्रयोगशाळा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.