आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनच्या संरक्षण निधीत 12 टक्क्यांनी वाढ, अत्याधुनिक शस्त्रास्त्र खरेदीची तरतूद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- चीनने आपली संरक्षण सिद्धता आणखी वाढविण्यासाठी कंबर कसली आहे. चीनच्या यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण निधीत 12.2 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीन सरकारने संसदेच्या वार्षिक अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीच ही घोषणा केली. चीनचा संरक्षण निधी आता 131.51 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.

आर्थिक वर्ष 2014 साठी चीन सरकारने देशाच्या संरक्षणावर अधिक भर दिल्याचे ‍दिसते. भूदल, हवाई दल यांची सिद्धता वाढविण्यासाठी चीनने अत्याधुनिक शस्त्रास्त्र खरेदीस हिरवा कंद‍िल दाखवला आहे.

लिबरेशन पीपुल्स आर्मीचे मनुष्यबळ सर्वाधिक आहे. जवानांची संख्या जवळपास 23 लाख एवढी आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा चीनच्या संरक्षण अर्थसंकल्पात मोठी वाढ करण्यात आली आहे. यंदा ही वाढ दुहेरी अंकात करण्‍यात आली आहे.

चीनचे पंतप्रधान केक्लिांग यांनी संसदेत सांगितले, की देशाच्या संरक्षण व्यवस्थेत क्रांतिकारी बदल करण्‍याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाच्या संरक्षणासाठी आपल्याला सज्ज राहायचे आहे. त्यासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची आवश्यकता भासणार आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात टिकून राहाण्यासाठी मारक आणि प्रतिरोधक क्षमता वाढविणेही तेवढेच गरजेचे होऊन बसले आहे.

पुढील स्लाइड्‍वर वाचा, संरक्षणावर सर्वाधिक निधी देण्यात अमेरिका अव्वल!