आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनच्या सायबर हेरगिरीत वाढ, अमेरिकेला धोका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - गेल्या काही वर्षांत चीनकडून होणा-या आर्थिक सायबर हेरगिरीमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली असून त्यामुळे भविष्यात अमेरिकेचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, असा इशारा अमेरिकेच्या एका वरिष्ठ काँग्रेस सदस्याने दिला आहे.

अमेरिकेला सध्या सायबर सुरक्षेच्या मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि आर्थिक सुरक्षा धोक्यात आली आहे. चीनकडून होणारी अमेरिकेची सायबर हेरगिरी कमी झालेली नाही. उलट नजीकच्या काळात तिच्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे आमचे राष्ट्रीय आर्थिक हितच धोक्यात आले आहे. सायबर हल्लेखोरांकडून संवेदनशील माहिती आणि नव्या कल्पना चोरल्या जात आहेत, असे काँग्रेस सदस्य मायकल रॉजर्स यांनी म्हटले आहे. गुप्तहेर विभागाच्या सिलेक्ट कमिटीसमोर ‘राष्ट्रासमोरील अत्याधुनिक सायबर धोका’ या विषयावर ते बोलत होते.