Home | International | China | chines journalists is excited after indian tour, china, international

भारतातील सदृढ लोकशाहीने चीनमधील पत्रकारांना केले प्रभावित

agency | Update - Sep 03, 2011, 04:20 PM IST

चीनमधील माध्यमे आता भारताबाबतचे वार्तांकन करण्याबाबत फारसा संकोचपणा ठेवणार नाहीत, असेच दिसते.

  • chines journalists is excited after indian tour, china, international

    बीजिंग- चीनमधील माध्यमे आता भारताबाबतचे वार्तांकन करण्याबाबत फारसा संकोचपणा ठेवणार नाहीत, असेच दिसते. कारण चीनमधील अनेक पत्रकारांनी नुकताच भारताचा दौरा केला. त्यात भारत त्यांना अतिशय आवडला असून आता ते भारताचे गोडवे गात आहेत. एक युवा पत्रकार म्हणाला भारतीय चीन लोकांकडे अपेक्षेने पाहतात व त्याच्याबाबत चांगले मत व्यक्त करतात.
    भारतीय लोक चीनच्या लोकांपेक्षा कमी तक्रार करतात. त्याचबरोबर चीनची बरोबरी करण्यासाठी भारताला काही ठरवून काम करावे लागेल. जानेवारीत सुमारे ४० पत्रकारांनी भारतीय दौरा केला होता. याआधी एवढ्या मोठ्या संख्येने चीनच्या पत्रकारांनी कधीही दौरा केला नव्हता.
    चीनच्या पत्रकारांचे असे म्हणणे आहे की, भारतात गेल्यावर अनेक अर्थांनी आमचे डोळे उघडले गेले. भारतातील गरीबी आणि विकास याबाबत अनेक मते होती. मात्र मुंबई हल्ल्यानंतर दहशतवादाला बळी पडत असलेल्या भारताबाबत वेगळा विचार करु लागलो.
    बहुतेक पत्रकार हे भारतातील सदृढ लोकशाहीमुळे अधिक प्रभावित झाले आहेत. तसेच भारतातील तरुणांच्या कौशल्यांकडे पाहूनही प्रभावित झाले आहेत. भारतातील तरुणांची संख्या पाहता देशाच्या विकासाला त्याचा मोठा फायदा होईल, असे त्याचे मत बनले आहे.

Trending